Marathi Suvichar Sangrah
Marathi Quotes On Life 1
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो,
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही…
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले,
तर भले भले डोंगर हि फोडून निघतात…
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही…
Marathi Quotes On Life 2
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो…
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
हे जरुर लक्षात असू द्या…
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात…!!!
Marathi Quotes On Life 3
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते…
आणि दुःखच उरले नसते,
तर सुख कोणाला कळलेच नसते…
Marathi Quotes On Life 4
सोन्यात जेव्हा ‘हिरा’ जडवला जातो
तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर
हि-याचा बोलला जातो…
तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,
आणि कर्म हा हिरा आहे,
हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं,
तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं…!!!