तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे..
गरीबांची कधी चेष्टा उडवु नका..
कारण नशीब पलटायला आणि
गरीब व्हायला वेळ लागत नाही शेठ..!
स्वतःच्या गरीबीची लाज कधीच वाटू देवू नका,
कारण पैसा कमी असला तरी,
आपल्या आई वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती..
परिस्थिती गरीब असली तरी चालेल,
पण विचार भिकारी नसावेत..
कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार करु नका,
कारण आपल्याला जे मिळते,
ते काही लोकांना मिळत सुद्धा नाही..!!
जेवढं मिळतंय त्यातच आनंद मानायला शिका..
कारण जे तुम्हाला मिळतंय ते अनेकांसाठी स्वप्न आहे..!!
जोडीदार गरीब असला तरी चालेल,
पण आयुष्यभर साथ देणारा हवा..